

Reelstar Sugarcane Worker Crushed Under Load
Sakal
लोहारा (जि. धाराशिव) : सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून प्रसिध्द असलेल्या ऊसतोड कामगाराचा अपघाती मृत्यू होऊनही संबंधित कारखान्याने कोणतीही ठोस मदत जाहीर न केल्याने संतप्त झालेल्या कामगार संघटनांनी समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यासमोर तीव्र आंदोलन छेडले. मयताच्या कुटुंबाला दहा लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी संघटनांनी कारखान्याचे कामकाज दिवसभर ठप्प पाडले.