25 लाखांची खंडणी मागणाऱ्या तत्कालीन पोलिस अधिक्षकाचा जामीन फेटाळला

सुषेन जाधव
बुधवार, 12 जून 2019

25 लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार याचा नियमीत जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला.

औरंगाबाद : तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार याचा नियमीत जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी फेटाळला.

डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करुन 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याकरीता तक्रारदारास डांबून ठेऊन, धमकी देऊन तक्रारदाराचे मानसिक तथा शारीरिक संतुलन बिघडवल्याच्या गुन्ह्यात जळगावच्या सत्र न्यायालयाने लोहार याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याविरोधात लोहार याने एप्रिल महिन्यात स्वतंत्र अपील दाखल करत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळीही त्याचा नियमीत जामीन अर्ज  खंडपीठाने फेटाळला होता. प्रकरणात सरकारी अभियोक्ता एम एम नेरलीकर यांनी काम पाहिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rejecting the bail of Police Superintendent who demanded Rs 25 lakhs of ransom