esakal | सेनगावमध्ये अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी दिला नकार; शेवटी मुख्याधिकाऱ्याने दिला मुखाग्नी

बोलून बातमी शोधा

कोरोना

सेनगावमध्ये अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी दिला नकार; शेवटी मुख्याधिकाऱ्याने दिला मुखाग्नी

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : येथील एका ६० वर्षीय नागरिकाचा कोरोनामुळे कवठा येथील कोविड सेंटरला मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मुखाग्नी देण्यास नकार दिल्यामुळे शेवटी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना अग्नी द्यावा लागला.

सध्या कोरोनामुळे मृत्युच्या अनेक घटना घडत आहेत. कुठे नातेवाईक आपल्या कुटुंबातील व्यक्तिसाठी ऑक्सीजन बेडसाठी प्रयत्न करीत आहेत. तर कुठे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी धावपळ सुरु आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती खुप अवघड होत चालली आहे. सेनगाव येथील ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना सेनगाव जवळच्या कवठा येथे कोविड सेंटरला दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु देखील सुरु होते. मात्र रुग्णाची प्रकृती अती गंभीर असल्यामुळे मंगळवारी ( ता. २७ ) रात्री १२ वाजता त्यांचा दुर्दुवी मृत्यु झाला. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले. यावेळी मृताच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर नातेवाईक आल्यावर त्यांनी फक्त सही करुन अत्यंविधी प्रशासनानेच करावा असे सांगितले.

बुधवारी ( ता. २८) सकाळी आठ वाजता मुख्याधिकारी शैलेश फडसे, अभियंता श्री. चव्हाण, प्रवीण महाजन हे कवठा येथे मृत व्यक्तीच्या अंत्यविधीची तयारी करण्यासाठी गेले. यावेळी नगरपंचायतचे कर्मचारी आकाश देशमुख, विजय हानवते, देवदास सुतार, मिथुन सुतार, लक्ष्मण सुतार, बाळु सुतार, विनोद कांबळे यांनी अंत्यविधीची सर्व तयारी केली. नातेवाईकांपैकी मुखाग्नी द्यायला कुणीही नसल्यामुळे शेवटी कवठा येथे नदीच्या काठावरील स्मशानभूमीत सेनगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी स्वतः च पुढाकार घेत मृत आत्म्यास मुखाग्नी दिला. यावेळी आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी सुध्दा उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे