
औरंगाबाद - अतिक्रमणधारकांना, सध्या ते ज्या ठिकाणी राहत आहेत, त्याच जागेवर घर बांधून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे शपथपत्र यासंदर्भात दाखल जनहित याचिकेत केंद्र सरकारद्वारे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी जागेवर गोरगरीबांना घर देण्यास नियमांची आडकाठी दाखविणाऱ्या राज्य शासनाला चपराक बसली आहे.
राज्यातील गायरान जमिनीवरील धनदांडग्यांचे अतिक्रमण काढण्याचे तर गरिबांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे तसेच यासंदर्भातील शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या निर्णयाचे पालन व्हावे यासाठी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाचे अध्यध राजेंद्र निबांळकर व पत्रकार कल्याण देशमुख यांनी अॅड. पी. एस. पवार यांच्यामार्फत सदर याचिका दाखल केली आहे.
राज्य शासनाने 1999 साली 1 जानेवारी 1985 पूर्वीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा तर 2002 साली 1 जानेवारी 1995 पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागात तहसीलदार व महापालिका हद्दीत आयुक्त यांना जागांचे ले-आऊट तयार करण्याचे अधिकार देण्यात आले होते. शासनाने अतिक्रमण नियमित करण्यासाठी 4 एप्रिल 2002 व 12 जुलै 2011 रोजी परिपत्रक काढले होते. सदर परिपत्रकानुसार शासकीय जागेवरील कुटुंबांना मालकी हक्काचे उतारे देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने 23 जून 2015 रोजी दिले होते. पण अद्यापही या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
उलट 12 जुलै 2011 रोजीच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावत गरीब कुटुंबांनाच बेघर करण्याचे धोरण राबविले जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. गरीबांना हक्काचे घर मिळण्यासाठी राज्य सरकारला केंद्र शासनाच्या निदेर्शांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती जनहित याचिकेत करण्यात आली आहे. याचिका दाखल होताच, केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेचे धोरण, मार्गदर्शक तत्वे स्पष्ट केली. सर्व घटकांना जागा उपलब्ध करुन देण्याची व वसाहतीकरणाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचे शपथपत्र केंद्राने दाखल केले. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाचे, संचालक चंद्रमनी शर्मा यांनी याविषयीचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यात पंतप्रधान आवास योजनेतील मार्गदर्शक तत्वानुसार गोरगरिबांना आहे त्या ठिकाणीच घरे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आल्याचे म्हटले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.