Covid-19 : वसमतमध्ये चौघे बाधित, हिंगोली जिल्ह्यात नवे पाच रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

सेनगाव येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती असलेल्या १२ ९ रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात होते त्यातील १०८ निगेटिव्ह आले असून मुंबईवरून परतलेल्या एका ४९ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.

हिंगोली - गेल्या तीन दिवसा पासून वाढणाऱ्या रुग्णसंख्या घट झाली होती . मात्र शुक्रवारी ( ता .29 ) रात्री आलेल्या अहवालात कोरोना बाधित रुग्णसंख्या पाचने वाढली आहे.

त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५ वर गेली आहे . 
सेनगाव येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती असलेल्या १२ ९ रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात होते त्यातील १०८ निगेटिव्ह आले असून मुंबईवरून परतलेल्या एका ४९ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तर २० अहवाल प्रलंबित आहेत. तसेच वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 93 व्यक्तींचे स्वब नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 52 निगेटिव्ह, 4 जण कोरोना पॉझिटिव्ह तर 37 अहवाल प्रलंबित आहेत. आता जिल्ह्याची एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या 171 वर पोचली आहे. 96 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. आता 75 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

हृदयद्रावक : नोकरी गेली, म्हणाला, ‘सोडून जाणार नाही मी तुला’ अन्...
 
या ठिकाणी उपाचार
कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे 8, सेनगाव येथे 13, हिंगोली येथे 29, वसमत येथे 15 या सर्वांची प्रकृती स्थिर असून, कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. याशिवाय हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये 10  रुग्ण दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत आयसोलेशन वॉर्ड व जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 2173 जणांना संशयित म्हणून भरती केले होते. यापैकी 1825 जण निगेटिव्ह आले आहेत. 1,746 जणांना घरी सोडले आहे.

412 जण भरती आहेत. अजूनही 254 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. हिंगोली जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत चालल्याने प्रशासनाने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित अंतर, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर आदी बाबी पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये, लहान मुले वृद्ध व गंभीर आजाराने पीडित असलेल्या लोकांनीही घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reports 52 New Covid-19 cases in Aurangabad