Badnapur News : आरक्षण नसल्याने उच्चशिक्षण घेऊनही शासकीय नोकरी मिळत नसल्याने तरुणीने संपविले जीवन

बदनापूर येथील गणेशनगर भागातील आपल्या राहत्या घरात एका २५ वर्षीय पदवीधर तरुणीने शनिवारी (ता. एक) दुपारी चार वाजता संपविले जीवन.
Rani Naikwade
Rani Naikwadesakal
Updated on

बदनापूर - येथील गणेशनगर भागातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन एका २५ वर्षीय पदवीधर तरुणीने शनिवारी (ता. एक) दुपारी चार वाजता आत्महत्या केली आहे. आरक्षण नसल्याने उच्चशिक्षित असून देखील शासकीय नोकरी मिळत नसल्याने तिने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती मुलीचे नातेवाईक तथा खादगाव (ता. बदनापूर) येथील सरपंच सोपान नाईकवाडे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com