राजीनामा देऊन परतणारा डॉक्टर अपघातात जखमी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारीपदाचा राजीनामा देऊन घरी परतत असताना डॉ. एस. डी. चौरे हे जखमी झाले. त्यांच्यावर किल्लेधारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

किल्लेधारूर (जि. बीड) -  समोरून येणाऱ्या भरधाव टेंपोला चुकविताना कार खड्ड्यात जाऊन अपघात झाल्याची घटना खामगाव-पंढरपूर रस्त्यावर धुनकवाड पाटीजवळ गुरुवारी (ता. दोन) घडली.

अपघातात माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारीपदाचा राजीनामा देऊन घरी परतत असताना डॉ. एस. डी. चौरे हे जखमी झाले. त्यांच्यावर किल्लेधारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. माजलगावकडून अंबाजोगाईला कारने (एमएच- ४४, एस- ०७९८) डॉ. चौरे व अन्य एक असे दोघेजण जात होते. कार बराशीत गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. चौरे यांचा हात निखळला असून, त्यांच्यावर धारूर येथेच उपचार केल्याचे धारूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चेतन आदमाने यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resigning doctor injured in accident