महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप घेतला मागे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

महसूल संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन, लिपिकाची महसूल सहायक पदाची प्रमुख मागणी मंजूर केली आहे. त्यामुळे येथील महसूल संघटनेने शनिवारी (ता. सात) पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे.

पैठण, ता. 7 (जि.औरंगाबाद) : महसूल संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन, लिपिकाची महसूल सहायक पदाची प्रमुख मागणी मंजूर केली आहे. त्यामुळे येथील महसूल संघटनेने शनिवारी (ता. सात) पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे.

ही माहिती संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष सतीश घावट यांनी दिली. नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवाभरती, नायब तहसीलदार पदाचा ग्रेडचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे. तसेच इतर प्रलंबित मागण्याही मंजूर करण्याचे महसूल सचिवांनी कळविले आहे. त्यामुळे हा संप मागे घेतला असल्याचे श्री. घावट यांनी महसूल कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले.

नायब तहसीलदार डी. बी. निलावाड, अरुण पंडुरे, येलनवार, संतोष अनर्थे, श्रीमती कमल मनोरे यांच्यासह पैठण-फुलंब्री उपविभागाचे उपाध्यक्ष सतीश घावट, सहसचिव प्रमोद विघोतेकर तसेच पैठण तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष नारायण बंगले तसेच सागर गांगवे, सुनील घुनावत, अविनाश जाधव, नितीन जाधव, अशोक जाधव, रवींद्र टोनगे, बालाजी कांबळे, जीवन चव्हाण, चरण राजपूत, अमोल पाखरे, मीर जफर अली, संदीप शेळके, जी. सी. माळी, एस. एस. थोटे, वसुधा बागूल, छाया कोल्हे, चतुर्थश्रेणी कर्मचारी अरुण बादाडे, मच्छिंद्र पवार, विमल गोजरे, ताराबाई वाघ आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue Staffs Call off Strike