Prataprao Pawar
sakal
AI in Farming - ‘शेतीच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही काळाची गरज आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी पुढे येऊन हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न्यावे. शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान सहज वापरण्यासारखे आणि परवडणारे आहे. यातून त्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ होईल,’ असा सल्ला ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी दिला.