esakal | गुंतवणूकदारांसाठी सध्याची वेळ योग्य 
sakal

बोलून बातमी शोधा

Right time for investoers

गुंतवणूकदारांसाठी सध्याची वेळ योग्य 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जगभरात 2008 नंतर आता सर्वांत मोठी मंदी आली आहे. याचा सर्वाधिक फटका जगभरातील छोट्या देशांना बसला आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. यामुळे निर्देशांक घटला आहे. अमेरिका, चीन या देशांतील मंदीमुळे हा प्रकार घटला आहे. याचा काहीसा परिणाम भारतावर जाणवत आहे; मात्र ही मंदी भारतीय शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी संधीच्या रूपाने चालून येत आहे. या काळात होणारी गुंतवणूक आगामी दोन ते तीन वर्षांत मोठे रिर्टन देणार आहे. देशात सुरू असलेल्या छोट्या गुंतवणुकीमुळे भारताचा शेअर बाजार वर्षभराच्या आत उभारी घेणार असल्याचा विश्‍वास शेअर मार्केटचे अभ्यासक अरुण पचिशिया यांनी व्यक्त केला. 


नोव्हेंबर-डिसेंबर 2018 पासून भारतात शेअर बाजारवर परिणाम दिसून आला होता. यामुळे शेअर मार्केटमधील प्रत्येक कंपनी सध्या तोट्यात आहे. शेअर मार्केटमध्ये असे चढ-उतार नेहमीच होत असतात. यावेळीही शेअर बाजार तोट्यात असला तरी हीच गुंतवणूकदारांसाठी मोठी पर्वणी ठरत असते. 2008 च्या मंदीच्या काळात अनेकांनी शेअर बाजारातील पैसा बुडेल या भीतीपोटी काढला होता; मात्र त्याच वेळी अनेकांनी गुंतवणूक केली होती. शेअर बाजारातून पैसा काढणाऱ्यांचा तोटा झाला आणि त्या मंदीच्या काळात पैसे गुंतवणाऱ्यांना दहा वर्षांत आठ पट नफा मिळाला. यामुळे ही मंदी भारतीयांसाठी नसल्यातच जमा असल्याचेही शेअर मार्केटच्या अभ्यासकांनी सांगितले आहे.

भारतात शेअरप्रमाणे म्युच्यअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. म्युच्युअल फंडातही एसआयपी सुरू असल्यामुळे भारतीयांची शेअर मार्केटमध्ये महिन्याच्या महिने गुंतवणूक होत आहे. हीच गुंतवणूक भारतीयांना मंदीतून बाहेर काढत संधी देत आहेत. वर्ष 2008 ला मंदी होती. तेव्हाही भारतावर कोणताच परिणाम झाला नव्हता. आता रोजगारावर परिणाम जाणवत असला, तरीही शेअर मार्केटवर याचा परिणाम झालेला नाही. हे मार्केट पाच ते सात महिन्यांत ग्रो करणार असल्याचा विश्‍वासही पचिशिया यांनी व्यक्‍त केला. 

loading image
go to top