Rishikesh Pakhare : बीडच्या ऋषिकेश पाखरेकडे फॉरेन्सिक व्हॅनची सूत्रे; देशातील पहिलाच प्रयोग
Forensic Expert : बीडच्या ऋषिकेश पाखरे याने फॉरेन्सिक सायन्समध्ये पदवी घेऊन त्याच्या वेगळ्या मार्गाने यश मिळवले. देशातील पहिल्या मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण त्याच्याद्वारे करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याला फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून प्रमाणित करण्यात आले.
बीड : आपण जो मार्ग निवडलाय, तो जरी इतरांपेक्षा वेगळा असला, तरी आपण आपल्या प्रयत्नाने आणि जिद्दीने यशस्वी होऊ शकतो, ही गोष्ट सिद्ध केली आहे बीडच्या ऋषिकेश पाखरे याने. फॉरेन्सिक सायन्समध्ये पदवी घेऊन याच क्षेत्रात आणखीन भरारी घेत मोठे यश मिळविले आहे.