girija river student dangerous journey
sakal
फुलंब्री - तालुक्यातील शेवता खुर्द व शेवता बुद्रुक या गावांच्या मधोमध गिरजा नदी आहे. सध्या ही नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवर पूल नसल्यामुळे एका गावातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात शाळेत जाण्यासाठी ग्रामस्थांनी थर्माकोलची बोट केली होती. त्यावरून विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत सुरू होती. ‘सकाळ’ने याकडे लक्ष वेधले होते. पण, प्रशासनाला जाग आली नाही.