Vidhan Sabha 2019 : ...आता वेळ आली ती धीरजला घडविण्याची : रितेश देशमुख

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अमित व धीरज या दोन्ही मुलांना लातूर ग्रामीण आणि लातूर शहरमधून काॅग्रेसने उमेदवारी दिली आहे. या दाेघांच्या प्रचारासाठी त्यांचा तिसरा भाऊ म्हणजे रितेश देशमुख मैदानात उतरला आहे. रितेश देशमुख याने प्रचार सभा घेत भाजप सरकारला निशाणा बनविला आहे.  

लातूर : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अमित व धीरज या दोन्ही मुलांना लातूर ग्रामीण आणि लातूर शहरमधून काॅग्रेसने उमेदवारी दिली आहे. या दाेघांच्या प्रचारासाठी त्यांचा तिसरा भाऊ म्हणजे रितेश देशमुख मैदानात उतरला आहे. रितेश देशमुख याने प्रचार सभा घेत भाजप सरकारला निशाणा बनविला आहे.   

यावेळी झालेल्या सभेत रितेशने राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. आमदार अमित देशमुख आणि जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. यावेळी लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

अर्ज दाखल केलेल्यानंतर आयोजित सभेत रितेशने सरकारवर कडाडून टीका केली. रितेश म्हणाला, मी अभिनेता आहे, जेव्हा जाहिरात करायची असते, मुलाखत द्यायची असते, तेव्हा आम्ही मेकअप करतो. सरकारच्या रस्त्यात अनेक खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी मेकअप करण्यात येईल. परंतु, एक लक्षात ठेवा मेकअप कितीही चांगला असला तरी तो उतरला की खरा चेहरा समोर येतो. असाच मेकअप या सरकारने केला आहे. मेकअप हटविला की, यांचा खरा चेहरा समोर येणार, अशा शब्दांत रितेशने भाजपचा समाचार घेतला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday Dear elder brother 

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd1517) on

लातूरमधील तरुणांना वाटतं की, साहेबांना मतदान करायचं नशीब आम्हाला लाभल नाही. ही भावना नवीन मतदारांची आहे. परंतु, आता अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना मतदार करून तरुणांना ती कसर भरून काढता येणार आहे. तुम्ही साहेबांना घडवल, भैय्याला घडवले आता वेळ आली ती धीरजला घडविण्याची, असंही रितेश म्हणाला.

धीरज यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अद्याप विरोधकांना उमेदवार मिळाला नाही. चांगला मुहूर्त शोधून उमेदवार देऊ असं ते म्हणत आहेत. पण माझ म्हणणं आहे की, उमेदवार जाहीर करण्यापेक्षा 21 तारखेची वाट पाहा. कारण उमेदवार देऊन काहीही होणार नाही, असा टोलाही रितेशने लगावला. ", 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ritesh deshmukh critisize bjp government