agitation for maratha reservation
sakal
कळंब - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच अंतरवाली सराटी येथे गेल्या बारा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता. ८) डिकसळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत कळंब-ढोकी-लातूर मार्ग रोखून धरला. सकाळी दहाच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.