

Jalna News
esakal
जालना: वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ व्हावी, यासाठी शासनाकडून राष्ट्रीय व राज्य मार्ग तयार करण्यात आले आहेत. मात्र, या मार्गांवरील अतिवळण, दिशादर्शक फलकांचा अभावामुळे सतत अपघात होत आहेत. त्यामुळेच मागील चार महिन्यांत जिल्ह्यात तब्बल १८० अपघात झाले असून, यामध्ये ९५ जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे आता ‘रोड सेफ्टी’ अंतर्गत जिल्ह्यात २४ ठिकाणी अपघाताचे ब्लॅक स्पॉट्स निश्चित करण्यात आले आहेत. या ब्लॅक स्पॉट्सवर उद्योजकांकडून २५ लाखांच्या सीएसआर फंडाचा आधार घेऊन अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.