दुर्घटना से देर भली : आरटीओच्या रॅलीने वेधले लक्ष : Video

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

जवळजवळ अर्ध्या किलोमीटर लांबीची ही प्रचार रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शहरातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांनी ही रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता.

औरंगाबाद : रस्ते सुरक्षा जनजागृतीचा भाग म्हणून आरटीओ कार्यालयातर्फे शनिवारी (ता. ३०) शहरातून जनजागरण फेरी काढण्यात आली होती. आरटीओ कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर वाहतूक पोलिस आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच शहरातील सर्व मोटर ड्राइविंग स्कूलचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.

रेल्वे स्टेशन आरटीओ कार्यालयातून निघालेली ही रॅली उस्मानपुरा, क्रांतीचौक, पैठण गेट, औरंगपुरा, मिलकॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, महावीर चौकमार्गे आरटीओ कार्यालयात विसर्जित करण्यात आली. रॅलीचे नेतृत्व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते, स्वप्निल माने यांनी केले. रॅलीतील सहभागी नागरिकांनी सुरक्षा, रस्ते अपघात टाळा, वेग मर्यादित ठेवा असे लक्षवेधी फलक हातात घेतले होते. 

जवळजवळ अर्ध्या किलोमीटर लांबीची ही प्रचार रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शहरातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या वाहनांनी ही रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता. सकाळी आठ वाजता निघालेली राहिली साडेनऊ वाजेच्या सुमारास आरटीओ कार्यालयात पोहोचली, त्यावेळी श्रीकृष्ण नकाते आणि स्वप्निल माने यांनी उपस्थितांना रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त श्रीमती मकवाना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री देशपांडे एम आय टी कॉलेज चे प्राचार्य श्री कुलकर्णी, श्री प्रशांत अवसरमल, राहुल अग्रवाल, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. दमगीर, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, शहरातील विविध नामवंत संस्था या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरटीओच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Safety Rally by RTO in Aurangabad