दरोडेखोरांची टोळी भोकरदन पोलिसांकडुन जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robbers Arrested

दरोडेखोरांची टोळी भोकरदन पोलिसांकडुन जेरबंद

भोकरदन : भोकरदन शहर व परीसरात दरोडा टाकण्याच्या तयारील असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला रात्रीच्या गस्तीवर असलेल्या भोकरदन पोलिसांनी शुक्रवारी (ता.13) पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाच संशयितांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून दोन वाहनांसह दरोड्यासाठी वापरण्यात येणारे धारधार लोखंडी साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून भोकरदन शहरात रात्रीच्या वेळी बंद असलेल्या घरांचे कुलुप कोंडा तोडुन घर फोडीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी भोकरदन शहरात रात्रगस्त वाढविण्याच्या सूचना भोकरदन पोलिसांना केल्या होत्या. यानुसार ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी रात्रगस्तीसाठी पथके नेमली होती. या पथकातील पोहेकॉ विष्णू बावस्कर, पोलिस नाईक गणेश पायघन, पो.कॉ गणेश पिंपळकर हे रात्रीच्या गस्तीवर असतांना या पथकाला भोकरदन- राजुर रस्त्यावरील कुंभारी पाटी जवळ असलेल्या एस्सार पेट्रोल पंपा समोर एक चारचाकी व एक दुचाकी वाहन उभे असलेले दिसुन आले.

पोलिसांनी त्यांना नाव गाव विचारुण, कशा करीता थांबले असल्याचे विचारण केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच सर्वांच्या तोंडाला मास्क लावलेले असल्याने पोलिसांचा संशय बळावला त्यामुळे पोलिसांनी सर्वांना ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी सर्वजण औरंगाबाद जिल्ह्यातील आडगाव सरक येथील असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे तेजराव श्रीराम राठोड, योगेश दामोधर रिठे, गणेश विश्वनाथ पठाडे, बंडु देवीदास रिठे, युवराज रावसाहेब रिठे असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांची झाडा-झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातुन लोखंडी कटर, लोखंडी टॉमी, लोखंडी रॉड, हॅण्ड ग्लोज असे दरोडा घालण्याचे साहीत्य मिळुन आल्याने हे सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांच्या विरुध्द भादंवि कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सपोनि राजाराम तडवी करीत असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी सांगितले.

गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

शहरात मागील काही दिवसांपूर्वी विविध ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे जेरबंद करण्यात आलेल्या संशयितांकडून भोकरदन पोलिस ठाण्या अंतर्गत घडलेले बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शिवाय ताब्यात घेतलेल्या संशयित तेजराव श्रीराम राठोड याचे विरुध्द विविध पोलिस ठाण्यात दरोड्याचे व दरोड्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे सपोनि जोगदंड यांनी सांगितले.

Web Title: Robbers Arrested Bhokardan Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top