Crime News : मिरची पूड डोळ्यात टाकून लुटणाऱ्यांना अटक
Chilli Powder Attack : धर्माबाद कडून कुंडलवाडीमार्गे बिलोलीकडे जात असताना एका व्यक्तीला चाकू आणि मिरची पावडर डोळ्यात टाकून लुटले गेले. स्थानिक पोलिसांनी व गुन्हे शाखेने दोन संशयितांना अटक करून ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कुंडलवाडी : चाकूचा धाक आणि मिरची पूड डोळ्यात टाकून एकाला लुटले होते. ही घटना धर्माबादकडून कुंडलवाडीमार्गे बिलोलीकडे जात असताना गोदावरी नदीवरील बाभळी पूल ते शेळगाव थडी या गावांदरम्यान १९ एप्रिल रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली होती.