Gold Necklace Theft : वसमतमध्ये काळ्या पल्सरवर आलेल्या चोरट्यांनी महिला गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले
Crime News : वसमत शहरातील विष्णू नगर भागात एका महिला गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून दोन चोरट्यांनी पळ काढला. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसमत : वसमत शहरातील विष्मू नगर भागात काळ्या पल्सरवर आलेल्या दोघांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढल्याची घटना घडली असून याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात झुक्रवारी ता. १३ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.