Jalna Heat Impact: वाढत्या उन्हाचा आठवडे बाजारावर परिणाम; सायंकाळीच खरेदीची गर्दी;रोहिलागड बाजारात दुपारी शुकशुकाट, संध्याकाळी उसळते ग्राहकांची वर्दळ

Rising Heat Affects Rural Weekly Markets: अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील आठवडे बाजारावर वाढत्या उन्हाचा परिणाम दिसून येत आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन असल्याने दुपारी बाजारात शुकशुकाट तर सायंकाळी पाचनंतर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.
Jalna Heat Impact

Jalna Heat Impact

esakal

Updated on

रोहिलागड: वाढत्या उन्हाचा ग्रामीण भागातील आठवडे बाजारावरही परिणाम होत आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन असल्याने सायंकाळी पाचनंतर ग्राहकांची बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र, यामुळे विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे.

बुधवारी (ता.११) अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील आठवडे बाजारातही उन्हामुळे दुपारी शुकशुकाट होता. बाजारात सध्या सध्या विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. भाजीपाल्याचे भाव देखील स्थिर असून वीस ते चाळीस रुपये किलोपर्यंत भाजीपाला मिळत आहे. सध्या शेतकरी बाजारात टरबूज -खरबूज विक्रीसाठी आपल्याच शेताच्या रस्त्याच्या कडेला बसून विक्री करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com