Sindkhed Raja Development: सिंदखेड राजा विकास आराखडा कागदावर नव्हे प्रत्यक्षात राबवा; मातृतीर्थासाठी ४५० कोटींच्या निधीसाठी रोहित पवारांचे प्रयत्न

मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी-विरोधकांनी अराजकीय भूमिका घेऊन एकत्र येण्याचे आवाहन; मंजूर ४५० कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची आमदार रोहित पवार यांची मागणी
Development Above Politics: Rohit Pawar Advocates for Sindkhed Raja’s Progress

Development Above Politics: Rohit Pawar Advocates for Sindkhed Raja’s Progress

Sakal

Updated on

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा येथील मातृतीर्थाच्या विकासासाठी सत्ताधारी-विरोधक असा भेद न ठेवता सर्वांनी अराजकीय भूमिका घेऊन एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.ता.७ मे रोजी राजमाता राष्ट्रमाता माँ. जिजाऊ यांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होवून अभिवादन केले.यावेळी नगराध्यक्ष सौरभ तायडे, उपनगराध्यक्ष दीपाली म्हस्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांचे प्रमुख नेते उपस्थित होते. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने मंजूर निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com