
शिवकुमार पाटील
किल्लेमच्छिंद्रगड: वाळवा तालुक्याच्या उत्तरेकडील गावात प्रधानमंत्री तसेच रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी सेवा चार्जच्या नावाखाली प्रत्येकी दहा ते पंधरा हजार रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
पात्र लाभार्थीना सदर योजनेचा लाभ देताना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार लाभ द्यायचा असे शासकिय धोरण आहे तथापि आम्ही तुम्हास लाभ मिळवून देत आहोत त्यासाठी घरकुल मंजुरीकरिता दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येईल अशा बतावण्या करून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत.