Karmad News : सहा कोटींची इमारत धूळखात; आरोग्यसेवा मात्र जुन्याच दोन खोल्यांत

वरूड काजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर रखडले; दोन वर्षांपासून प्रसूती व आयपीडी सेवा बंद, सहा महिन्यांपासून कुटुंबकल्याण शस्त्रक्रियाही ठप्प
Warud Kaji Primary Health Centre

Warud Kaji Primary Health Centre

sakal

Updated on: 

- बाळासाहेब काळे

करमाड - ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य केंद्रांच्या इमारती उभारल्या जातात. मात्र, वरूड काजी (ता.छत्रपती संभाजीनगर )येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधांचे चित्र चिंताजनक आहे. तब्बल सहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली नवीन इमारत बांधकाम पूर्ण होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप वापरात आलेली नाही.

त्यामुळे नवीन इमारत तयार असतानाही जुन्या जीर्ण इमारतीतील अवघ्या दोन खोल्यांतून आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रसूती सेवा आणि आंतररुग्ण विभाग (आयपीडी) पूर्णतः बंद असून, सहा महिन्यांपासून कुटुंबकल्याण शस्त्रक्रियाही ठप्प आहेत. परिणामी, सुमारे ५४ हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...