Jalna News: ग्रामीण भागामध्ये वाळवणात गुंतल्या महिला; कुरड्या, खारवड्या बनविण्याची लगबग, शहरात रेडीमेडला पसंती
Kurdiya, Papad, and Chips Production:जालना ग्रामीण भागातील महिलांनी उन्हाळ्यात वाळवणातील पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू केली आहे. कुरड्या, पापड, खारवड्या, चिप्स यांसारखे पदार्थ वर्षभरासाठी तयार होतात.
जालना: उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच गृहिणींच्या उन्हाळी कामांची सुरवात झाली असून कुरड्या, पापड, खारवड्या, चिप्स यांसारखे पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे अंगणात महिला वाळवणाची कामे करताना दिसत आहेत.