
पाथरी : तालुक्यातील बाभळगाव येथील रणेर कुटुंबीयांचा पंढरपूर आषाढी वारीतील मानाचा अश्व बुधवारी (ता. चार) टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूर वारीसाठी रवाना झाला. पंढरपुरातून हा अश्व देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे.