हिंगोलीच्या साहू चिवड्याची चव पोहचली साता समुद्रापार

फोटो
फोटो

हिंगोली  घरात चिवडा करायचा तो डब्यात भरून डोक्‍यावर घेवून शहरभर फिरुन त्‍याची विक्री करायचा असा अनेक वर्ष दिनक्रम असलेल्या शहरातील साहु परिवाराच्या हाताची चव शालेय विद्यार्थ्याची डब्यापासून ते अनेकाच्या नातेवाईकापर्यत ती जिल्‍ह्‍यातच नव्हे तर साता समुद्रापार पोहचली आहे 

शहरातील गाडीपुरा भागात मनोजकुमार साहु, विशाल साहु, मयुर साहू हे राहतात मनोजकुमार हे कुंटूंब प्रमुख आहेत. त्‍यांचा वडिलोपार्जीत चिवडा करून विकण्या व्यवसाय आहे त्‍यांच्याकडे जिद्द, चिकाटी, मेहनत प्रामाणीक पणा शुध्दता या कसोट्यावर तयार होणाऱ्या या चिवड्याला राधेश्याम साहु असे ब्रॅन्‍ड नेम मिळाले आहे. तीन पिढ्यापासून सुरू असलेला हा व्यवसाय डोक्‍यावरून आता गाड्यावर आला आहे. सुमारे चाळीस वर्षापुर्वी राधेशाम साहू हे घरात चिवडा तयार करायचे एका डब्यात चिवडा घेवून सायंकाळच्या वेळी शहरात गल्‍लोगली जावून त्‍याची विक्री करणे असा त्‍यांचा दिनक्रम होता. 

चिवडा गाड्यावर ठेवून शहरातील गांधी चौकात

सुरवातीला या चिवड्याची बच्चे कपंनीला चव कळाली नंतर तो सर्वाच्याच जिभेवर रुजू लागल्याने त्‍याच्या मागणीत वाढ होत गेली व्यवसायाचा व्‍याप वाढला त्‍यानंतर मनोजकुमार आणि कचरुलाल या मुलांनी लक्ष घातले. त्‍यांनी हा चिवडा आणगी खमंग केला आता राधेशाम यांचे नातू मयुर मनोज साहु, विशाल कचरुलाल साहु हे ही मदत करतात. कुटूंबात सुमारे दहा सदस्य असून महिला सकाळपासून चिवड्याच्या कामात दंग होतात. तयार चिवडा गाड्यावर ठेवून शहरातील गांधी चौकात आणाला जातो सायंकाळी पाच ते दहा या वेळात पंधरा ते वीस किलो चिवडा संपतो विशेष ऑर्डर घरातुन पुर्ण केल्या जातात पुर्वी या गाड्यावर चिमणी होती आता बॅटरीवर चालणारा बल्‍ब लावला जातो. साधेपणाची साक्ष देणारा हा बदल अलिकडेच झाला आहे.

चिवड्याचा असा झाला प्रसार 

विद्यार्थी, नोकरदारामुळे चिवड्याची चव जिल्‍हाभरासह मराठवाडा, राज्‍यातील अन्य भाग गुजरात, आंध्रप्रदेश, राज्यस्‍थान, दिल्‍ली, सिंगापूर, स्‍वीडन, अमेरिकेपर्यत गेली आहे. परभागातुन येणारे चिवड्याचे पार्सल सोबत घेतात तसेच चिंतामणी गणपतीच्या मोदकोत्‍सव, दसरा व दिवाळीला आलेल्या माहेरवाशीणी देखील जाताना चिवड्याचे पार्सल घेवून जातात दिवाळीला स्‍विडन येथे शहरातील काही कूंटूंबे महाराष्‍ट्रीय कुंटूंबाला एकत्र बोलावत दिवाळीच्या फराळात साहुचा चिवड्याचा खास बेत ठेवतात असे मनोजकुमार सांगतात. एकत्र कुटूंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसावर चालतो असेही त्‍यांनी सांगितले. 

चिवड्यासाठी खास रेसीपी 

दगडी पोहे, शेगदाणा, मसुरदाळ, चणादाळ, चवळीदाळ, मटकीदाळ, मसाला, शेगदाणा तेल आदी घटक वापरले जातात तसेच विशष्ट मसाला आणि चिवडा तयार कण्याची विशिष्ट लकब हे या परिवाराचे वैशिष्टे आहे चिवड्यात कांदा, लसूण, कोथींबीर चवीसाठी धने पावडर, जिरे, ववा, कलमी, वापरून गाड्यावर मिळणारे मिश्रण चविष्ट तर असते पण पाहण्यासारखेही 

वडीलोपार्जित चालत आलेला हा व्‍यवसाय

वडीलोपार्जित चालत आलेला हा व्‍यवसाय आजही सुरूच आहे. माझी मुले देखील हेच काम करतात. चिवड्याची चव देखील कायम असल्‍याने मागणी आहे. मागच्या काही वर्षापासून रेडीमेड चिवडा त्‍याचे कमी असलेले दर यामुळे व्यवसावर थोडा फरक पडला आहे. मात्र आजही शहरातील काही नागरीक बाहेर देशात राहतात ते येथे आल्‍यावर चिवडा घेतल्या शिवाय जात नाहीत तेथे अनेक मित्राना त्‍याची चव चाखायला देतात यामुळे दोन किलोपासून पाच किलोपर्यत त्‍याची मागणी होते.

                  मनोजकुमार साहु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com