केज - आडकेश्वर गणेश मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ 'माझ्या पप्पानं आणलाय गम्पती' या गीताने प्रकाश झोतात आलेल्या साईराज केंद्रे याच्या हस्ते बुधवारी (ता.०३) सायंकाळी सहा वाजता करण्यात आला. यावेळी त्याने 'गाडी झुकू-झुकू चाले, माझे गणपती बाप्पा आले' यासह इतर गणपती गीतावर नृत्य सादर करत धमाल उडवून देत उपस्थितांची मने जिंकली.