MSEDCL 6 Senior Officers Suspended
sakal
- नितीन चव्हाण
बीड - बीड जिल्ह्यातील महावितरणच्या कामांची कंत्राटे वाटप आणि कामांमधील तब्बल १३ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर मोठा स्फोट झाला असून, ६ बड्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या घोटाळ्याविरोधात उगारलेला आक्रमक पवित्रा, त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि दैनिक सकाळने लावून धरलेल्या भंडाफोडानंतर चौकशी समितीच्या ठपक्यावरून ही धडक कारवाई झाली आहे.