Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाकडून सातत्याने फसवणूक होत असल्याचा आरोप.
maratha community agitation for maratha reservation

maratha community agitation for maratha reservation

sakal

Updated on

जेवळी - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाकडून सातत्याने फसवणूक होत असल्याचा आरोप करत तसेच आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ लोहारा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. ४) आष्टामोड येथे पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सुमारे एक तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. मागण्या तातडीने मान्य न केल्यास मुंबईतील मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com