

Avian Architecture: Baya Weaver Birds Begin Pre-Monsoon Nesting Work in Kannad
Sakal
संतोष निकम
कन्नड : निसर्गाचा चमत्कार आणि पक्षांची मान्सूनपूर्व पूर्वतयारी सध्या कन्नड तालुक्यात पाहायला मिळत आहे. पहिल्या पावसाचे आणि रोहिणी नक्षत्राचे वेध लागताच, निसर्गाचा उत्कृष्ट अभियंता समजल्या जाणाऱ्या 'सुगरण' पक्षाने आपली कलाकुसर सुरू केली आहे. तालुक्यातील औराळा येथील कैलास बापुराव देशमुख यांच्या शेतातील विहिरीच्या कडेला असलेल्या झाडांवर आणि शेतशिवारातील बाभळीच्या झाडांवर सुगरण पक्षांची सुंदर घरटी लटकताना दिसत आहेत.