Gram Panchyat Office Fire : साखरा ग्रामपंचायत कार्यालयाला आग; कागदपत्रे जळाल्याने संशय

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील ग्रामपंचायतीला गुरुवारी ता. २८ दुपारी एक वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत काही कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.
Fire
FireSakal

सेनगाव - तालुक्यातील साखरा येथील ग्रामपंचायतीला गुरुवारी ता. २८ दुपारी एक वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत काही कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. गावकऱ्यांनी वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या आगीबाबत ग्रामस्थांमधून संशय व्यक्त केला जात असून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

साखरा येथील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी सकाळी ग्रामसेवक राजेंद्र गोर्डे हे आले होते. कार्यालयीन कामकाज केल्यानंतर ते दुपारी कार्यालयाच्या बाजूला गेले असता ग्रामपंचायत कार्यालयाच्या खिडकीतून अचानक धुर निघू लागला होता. कार्यालयास आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास सुरुवात केली. त्यानंतर आग विझविण्यात गावकऱ्यांना यश आले.

या आगीमध्ये ग्रामपंचायतमधील काही महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या घटनेमध्ये ग्रामसेवक गोर्डे यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात जाऊन त्यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयात चाकू हल्ला झाला अन कार्यालय पेटविण्यात आल्याचे तोंडी सांगितले. त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर ग्रामसेवक गोर्डे यांनी ज्या व्यक्तींची नांवे सांगितली ती मंडळी देखील सेनगाव पोलिस ठाण्यात आली असून आमची देखील तक्रार नोंदवून घेण्याची मागणी चालवली आहे. सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या पथकाने साखरा येथील ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन पाहणी केली आहे. या संदर्भात सेनगाव पोलिसात अद्याप पर्यंत कुठलीही तक्रार दिलेली नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही.

ग्रामपंचायतमध्ये १५ वित्त आयोगाच्या निधी मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली जात होती. या मागणीसाठी काही गावकरी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणालाही बसले होते. त्यामुळे झालेला गैरव्यवहार दडपण्यासाठी आगीचा प्रकार झाला असावा अशी चर्चा सुरु झाली आहे.

साखरा येथील ग्रामपंचायतला आग लागल्याची नुकतीच माहिती मिळाली आहे. या ग्रामपंचायतची १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या तक्रारीवरून चौकशी सूरु आहे.

- माधव कोकाटे (गटविकास अधिकारी, सेनगाव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com