पगारच पुरत नाही, बचत कशी करू? हा घ्या सल्ला..

file photo
file photo

नांदेड : आज प्रत्येकजण मिळविलेल्या उत्पन्नातून बचत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेक क्षेत्रात पगार कमी मिळतो. मिळणाऱ्या पगारावर कसरत करत घरगाडा अनेकांना चालवावा लागतो. तर मग बचतीचा प्रश्‍न येत नाही. तरीही माणूस आपल्या भविष्यासाठी पोटाला चिमटे देत बचत करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी काय व कशी बचत करावी याचा सल्ला आर्थीक सल्लागार सुभाष सदावर्ते यांनी `सकाळ’च्या माध्यमातून नागरिकांना दिला आहे.

जेवढे उत्पन्न तेवढा खर्च “विलासी” जीवनशैली. या प्रकारात मिळणाऱ्या उत्पन्नाचे खर्चात रुपांतर करण्याकडे कल असतो. नोकरीत बोनस अथवा व्यवसायात अतिरिक्त नफा झाल्यास चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याची योजना तयार असणे. उत्पन्न कमी परंतु खर्च जास्त “होऊ दे खर्च” ही जीवनशैली या प्रकारात तुलनात्मक वृत्ती झळकत असते. या प्रकारातील लोक कायम कर्जात राहणे पसंत करतात.
उदाहरणार्थ ऐपत नसतांना पत मिरविण्यासाठी पात्रता नसलेल्या मुलांना महागडया शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणे.
वरील (१ व २) प्रकारच्या सवयी “जो भी होगा देखा जायेगा” या बेफिकीर मानसिक वृत्तीतून तयार होत असतात. नियोजनाच्या अभावामुळे या प्रकारातील लोक लवकर नैराश्याच्या गर्तेत जाण्याची शक्यता जास्त असते.

उत्पन्न आणि खर्च यांचा सुयोग्य मेळ “आर्थिक शिस्तपालन” जीवनशैली

या प्रकारातील लोक मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्त्रोत बघून खर्चांची आखणी करतात. यांना तणावमुक्त आर्थिक जीवनशैली मान्य असते.
उदा. हॉटेलचा खर्च परवडत नसल्यास भेळ- पाणीपुरी खाऊन तृप्त होतात.

उत्पन्नातून बचत करून खर्च करणे “भविष्याचा वेध घेणारी” जीवनशैली

या प्रकारातील लोक वर्तमानात गरजेपुरता खर्च करून भविष्यात येणाऱ्या ध्येयांबद्दल योजना आखत असतात. याच गटातील लोकांना आपण कंजूष किंवा काटकसरी म्हणून हिणवत असतो. परंतु दीर्घकाळात हाच बचतकर्ता गुंतवणूकदार बनून त्याची “बकेट लिस्ट” पूर्ण करत असतो.
वरील (३ व ४) प्रकारातील लोक “ या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे ” या जबाबदार मानसिक वृत्तीचे असतात. यांना सुरुवातीला नियोजन अथवा काटकसर करून भविष्यात आनंद घेण्यात रस असतो.

बचतीची तुमची “सवय” कुठली? एकदा पडताळून बघा.

आता आपण मासिक अथवा वार्षिक उत्पन्नाची विभागणी एका आर्थिक अभ्यासानुसार कशी असावी? याबाबत जाणून घेऊ.
यात देखील उत्पन्नाचा विनियोग चार टप्प्यात केला आहे.
घरखर्च – ३०%
परतफेड – ३०%
गुंतवणूक – ३०%
वैयक्तिक – १०%
वरील ४ टप्प्यांचे थोडक्यात विश्लेषण पाहू.
जर तुम्हाला दैनंदिन खर्च लिहून ठेवण्याची सवय असेल तर तुम्ही लवकरच “गुंतवणूकदार” बनू शकतात. नसेल तर गृहमंत्र्यांकडेच अर्थखात्याची अतिरिक्त जबाबदारी द्या. ही सवय म्हणजे आरशात स्वतः ला पाहणे. कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही. या सवयीचा चांगला परिणाम म्हणजे तुम्ही कुठे वायफळ खर्च करत नाहीत ना? हे माहित होण्यास मदत होते. म्हणजेच तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण आणून बचत वाढवू शकतात.
वरील सवय प्रामाणिकपणे आत्मसात केल्यास परतफेड किंवा गुंतवणूकीचे नियोजन करणे सोपे होईल. आज तुम्हाला देणी (उदा. कर्ज) असलेली यादी बनवा. त्यावर होत असलेली व्याज आकारणी व परतफेड होणारी रक्कम यांचा आढावा घ्या. शक्य तितक्या लवकर देणी संपवा. या सवयीचा फायदा तुम्हाला आरोग्यदायी व आनंदी जीवन जगण्यास मदत करेल.
लहानपणी आपण पळण्याची शर्यत सुरु करण्यापूर्वी १, २ साडे माडे ३ असे म्हणून सुरु करायचो. ज्याचं लक्ष ध्येयाकडे असायचं त्याला सगळ्यात अगोदर ३ ऐकू येत असे. तीच शर्यत पुन्हा सुरु होण्यापूर्वी ३ ऐकण्याची सवय जोपासा.
वरील ३ टप्पे पार पाडायचे असतील तर तुम्ही स्वतः मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. यासाठी नव- नवीन गोष्टी शिका, तुमचे छंद जोपासा, स्वतःच्या मनोरंजनासाठी खर्च करा. कारण तुम्हाला सतत एक नवी ऊर्जा मिळणे गरजेचे आहे.

शिस्त लावण्याचा प्रयत्न

“गुंतवणूक” करणे किंवा “आर्थिक नियोजन” करणे हे फक्त श्रीमंतांचे काम आहे. हा गैरसमज दूर करा. वरील मुद्दे लक्षात घेऊन स्वतः ला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. जिथे आवश्यकता असेल तिथे सल्लागार नेमा. कारण “सगळ्याच गोष्टी मला जमतील” असा फुकाचा आत्मविश्वास बाळगू नका. “आर्थिक शिस्त” जोपासणे ही “आर्थिक नियोजनाची” पहिली पायरी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com