
निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर हे 13 हजार 740 मतांनी विजयी झाले तर काँग्रेसचे प्रतिस्पर्धी अभय साळुंके 98 हजार 628 मताधिक्य घेऊन द्वितीय क्रमांकावर राहिले. तर वंचितचे मंजुषा निंबाळकर तिन हजार 898 मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. यामुळे निलंग्यात पुन्हा कमळ फुलले आहे. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे