Beed : गेवराईत एकाच नंबरच्या आठ रिक्षा, पोलिसांनी केली कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed
Beed : गेवराईत एकाच नंबरच्या आठ रिक्षा, पोलिसांनी केली कारवाई

Beed : गेवराईत एकाच नंबरच्या आठ रिक्षा, पोलिसांनी केली कारवाई

sakal_logo
By
वैजिनाथ जाधव

गेवराई (जि.बीड) : गेवराई (Gevrai) शहरातील रस्त्यावर एकाच नंबरच्या आठ रिक्षा धावत होत्या. या आठही रिक्षांना गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईची प्रक्रिया गेवराई पोलीस ठाण्यात चालू आहे. शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीचे व एकाच नंबरचे आठ रिक्षा धावत होती. याची कोणालाच माहिती नव्हती. विशेष म्हणजे रिक्षा मालक व चालक यांना देखील (Beed) याची कल्पना नसल्याचे दिसून आले. परंतु डीपी पथकाच्या धडक कारवाईत अनेक गुन्हे उघड होत असून त्यांनी केलेल्या कारवाईत (एमएच २३ टीआर ३११ ) या एकाच क्रमांकाचे आठ रिक्षा पकडण्यात आले आहेत.

हेही वाचा: शनिवारी लग्न अन् सोमवारी केली आत्महत्या, नवरदेवाचे टोकाचे पाऊल

आठ ही रिक्षा गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत. या एकाच नंबरच्या आठही रिक्षा मालक व चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई डीपी पथकाचे प्रफुल्ल साबळे, जमादार विठ्ठल देशमुख, कृष्णा जायभाय, पोलीस नाईक नवनाथ गोरे यांनी केली आहे.

loading image
go to top