

Samruddhi Accident News
esakal
लासूर स्टेशन (ता. गंगापूर): समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (ता. 2) पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रॅव्हल्स बसची ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. धडकेनंतर बसने तात्काळ पेट घेतला. या दुर्दैवी घटनेत बस चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर बसमधील २९ प्रवाशांनी आपत्कालीन खिडकीतून बाहेर उड्या घेतल्याने त्यांचे प्राण सुदैवाने वाचले आहेत.