

फुलंब्री - निमखेडा येथील नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून विनापरवाना वाळूचा उपसा होत आहे. याकडे पोलिस महसूल विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर येते. विशेष म्हणजे नदीपात्रातून रात्री वाळूचा उपसा केला जातो. तर दिवसा वाळूची वाहतूक होत असताना महसूल व पोलिस विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने पोलीस, महसूल व वाळू तस्करांची साखळीच असल्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरू आहे.