
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक, नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे
बीड : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक, नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोमवारी (ता.२८) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, शिवसेनाप्रमुख कुंडलिक खांडे आदींच्या उपस्थित श्री. गुंजाळ यांनी हातात शिवबंधन बांधले.
पेठ बीड भागातील सिंहासनाधिश ग्रुपच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन निर्माण करणाऱ्या बाळासाहेब गुंजाळ यांनी नगरसेवकपद भूषविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे ते कट्टर समर्थक होते.
लातूर महापालिकेचे आर्थिक गणितच जुळेना, आठशे कर्मचारी पगारीच्या प्रतीक्षेत
श्री. गुंजाळ यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला अखेरचा रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रवेशाने पेठ बीड भागात पुन्हा एकदा शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण होणार आहे, असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले.
(edited by- pramod sarawale)