Vidhan Sabha 2019 : बीडमध्ये बोगस मतदानावरून राडा; मतदानाला आणले बाहेरून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

पाटोदा येथील महाविद्यालयात नोकरीला असल्याचे यातील लोकांनी सांगितले. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना मतदान करण्यासाठी आम्हाला सांगितल्याचेही हे मतदार म्हणाले.

बीड : बाहेरच्या मतदार संघातील रहिवाशी असलेले मतदार बीडमध्ये मतदानासाठी आल्याचा प्रकार समोर आला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे काहीवेळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.

पाटोदा येथील महाविद्यालयात नोकरीला असल्याचे यातील लोकांनी सांगितले. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना मतदान करण्यासाठी आम्हाला सांगितल्याचेही हे मतदार म्हणाले. यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला. पाटोदा हे आष्टी मतदार संघात आहे. आम्ही पाटोदा येथील महाविद्यालयात नोकरीला असल्याचे मतदानासाठी आलेल्यांनी सांगितले.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. बीडमध्ये काका-पुतण्यामध्ये लढाई असून, शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, तर राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर निवडणुकीच्या मैदानात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandip Kshirsagar and Jaydatta Kshirsagar involve in a fight in Beed over proxy voting