परभणी लोकसभा मतदारसंघातून संजय जाधव  निवडून येणार; शिवाजीराव चोथे

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून खासदार संजय जाधव हेच पुन्हा निवडून येणार असा विश्वास शिवसेनेचे समन्वयक शिवाजीराव चौथे यांनी व्यक्त केला.
Sanjay Jadhav will elected from Parbhani Lok Sabha Constituency Shivajirao Chothe
Sanjay Jadhav will elected from Parbhani Lok Sabha Constituency Shivajirao Chothe Sakal

जिंतूर : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून खासदार संजय जाधव हेच पुन्हा निवडून येणार असा विश्वास शिवसेनेचे समन्वयक शिवाजीराव चौथे यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.६) शहरातील संत सावता महाराज मंदिराच्या सभामंडपात तालुक्यातील शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला व दलित आघाडी सह पक्षकार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

शिवसेना उपनेते खासदार संजय जाधव, संतोष सांबरे, सहसंपर्कप्रमुख गंगाप्रसाद घुगे, संजय साडेगावकर, विधानसभा प्रमुख राम नाना पाटील खराबे, रमेश डक, रंजीत गजमल, हनुमान बोबडे,उद्धव काजळे, प्रभाकर वाघीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पक्षाचे लोकसभा समन्वयक शिवाजीराव चौथे मार्गदर्शन करताना परभणी लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय जाधव निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आवाहन केले.

तर प्रमुख उपस्थितांनी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची माहिती सर्व मतदारांच्या घराघरात पोहोचवण्याचे आवाज करून शिवसेनेने आजवर ८० टक्के समाजकारण केले आहे.

व २० टक्केच राजकारण केले आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील सर्व मतदार आपल्यावर भरभरून प्रेम करत आहे. असे म्हटले. याप्रसंगी पक्षाचे तालुकाप्रमुख राम शर्मा, शहर प्रमुख अरविंद कटारे, विठ्ठल राठोड ,परमेश्वर ठोंबरे, अशोक शिंदे पस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com