

बेघरांना मिळणार हक्काची सावली! देगलूरमध्ये 'स्वाधार गृहनिर्माण' प्रकल्पाचा आज भूमिपूजन सोहळा; अतिवृष्टीग्रस्तांसाठी विविध संस्थांचा मदतीचा हात
देगलूर : रावणगाव, हसनाळ व परिसरातील गावांना सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे मोठा फटका बसला होता. या आपत्तीमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून काहींना गाव सोडण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर बाधित नागरिकांना पुन्हा हक्काचे घर मिळावे या उद्देशाने “स्वाधार गृहनिर्माण प्रकल्प” हाती घेण्यात आला आहे.