

State Level Triumph: Sanskruti Alanjkar Secures First Rank in Maharashtra Oratory Contest
sakal
गंगापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील संजरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी संस्कृती संतोष आळंजकर हिने “महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धा २०२६” मध्ये राज्यातून प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातील सुमारे १७ जिल्ह्यांतील ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत संस्कृतीने आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीच्या जोरावर गट क्रमांक दोनमध्ये अव्वल स्थान पटकावत गंगापूर तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले.