Paithan Wari: १२ दिवसांनी संत एकनाथ महाराजांच्या पालखी-पादुका पैठणमध्ये दाखल; ‘नाथ महाराज की जय’च्या जयघोषाने स्वागत

Sant Eknath Maharaj Palkhi Returns to Paithan After 12 Days: आषाढी वारीनंतर संत एकनाथ महाराजांच्या पादुका १२ दिवसांनी पैठणमध्ये परत; टाळ-मृदंग, हरिनाम आणि फटाक्यांच्या आतषबाजीने भक्तिभावपूर्ण स्वागत
Sant Eknath Maharaj Paduka Palkhi Returns to Paithan After Pandharpur Wari Devotees Celebrate With Grand Welcome

Sant Eknath Maharaj Paduka Palkhi Returns to Paithan After Pandharpur Wari Devotees Celebrate With Grand Welcome

esakal

Updated on

-चंद्रकांत तारु

पैठण: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी-पादुका सोहळ्याचे रविवारी (ता. ९) १२ दिवसांनंतर स्वगृही आगमन झाले. पालखी वेशीवर येताच ‘नाथ महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा निनाद, विविध वाद्यांचा गजर, रांगोळीच्या पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी करीत पैठणकरांनी नाथांच्या पादुका सोहळ्याचे भक्तिभावाने स्वागत केले.नाथांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com