पैठण - आषाढी वारीनिमित्त येथील संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे १८ जूनला विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. चांदीपासून बनविलेल्या रथात प्रथमच संत एकनाथ महाराज यांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत. पुण्यात चांदीच्या रथाची तयारी सुरु आहे.