

The Impact of Adhik Maas: Ashadhi Wari Schedule Pushed by a Month
Sakal
पैठण : अधिक मासामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला असून, राज्यातील संतांच्या पालख्या नेहमीपेक्षा सुमारे एक महिना उशिराने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. त्यात पैठण येथील संत एकनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचा समावेश आहे. नाथांचा हा पायी दिंडी सोहळा अधिकमास महिना आल्याने पुढील महिन्यात ७ जुलै रोजी पैठण येथुन पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे. यंदा या सोहळ्याचे ४२७ वे वर्ष आहे.