Ashadhi Wari 2025 : वारीत एक हजार वारकऱ्यांची योगसाधना; हरिनामाचा गजर आणि शांतीचा संगम
Yoga Day : संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याची पंढरपूरकडे यात्रा सुरू झाली असून, यंदा योग दिनाच्या खास प्रसंगी एक हजारांहून अधिक वारकऱ्यांनी सामुदायिक योगसाधनेचा अनुभव घेतला. हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि योग साधनेचे अद्वितीय संयोजन सर्वांसाठी एक आध्यात्मिक अनुभव ठरले.
गेवराई : संत मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने प्रस्थान करत आहे. प्रत्येक मुक्कामी हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि वारकऱ्यांचा अद्वितीय शिस्तबद्ध उत्साह अनुभवास येत आहे.