जालना : आषाढी वारीसाठी जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून पंढरपूरला निघालेल्या संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचे रविवारी ( ता. १५) जालना जिल्ह्यात आगमन झाले. पालखीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले..मानाच्या सात पालख्यांपैकी एक असलेली श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचे जालना जिल्ह्यातील वाघरूळ जहागीर येथून मराठवाड्यात प्रवेश केला आहे. पुढील दोन दिवस पालखीचा जालन्यात मुक्काम असणार आहे. या सोहळ्याचे यंदाचे ३१८ वे वर्ष आहे. पंढरपूरमध्ये दाखल होणारी पहिली दिंडी म्हणून या पालखीचा मान आहे. मुक्ताईनगर येथून पाच जूनला प्रस्थान केलेला हा पालखी सोहळा ३० दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूरला दाखल होणार आहे. या सोहळ्यात एक हजार सातशे वारकरी सहभागी असून महिलांची संख्या लक्षणीय आहे..पालखी सोहळा मार्गावरील गावागावांत रांगोळ्या रेखाटल्या होत्या. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दिंडीचे जालना शहरात आगमन झाले. कन्हैय्यानगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थान येथे पालखी मुक्कामी आहे. येथील नागरिकांकडून व्यवस्था करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती..विठू नामाचा जयघोषवाघरूळ जहागीर येथे पालखी सोहळा दुपारी विश्रांतीसाठी थांबला असता महिला वारकऱ्यांनी अभंग म्हणत फुगड्या खेळल्या. दरम्यान, रात्री कन्हैय्यानगर येथे पालखी मुक्कामी आली असता वारकरी अभंग, भजनासह विठूरायाच्या जयघोषात दंग झाले..Chh. Sambhaji Nagar News : गंगापूरमध्ये २५५ किलो मांस जप्त.पालखीचा जिल्ह्यातील प्रवासपालखी सोहळा सोमवारी ( ता. १६) शहरातील पांजरापोळ गोरक्षण ट्रस्ट जवाहर बाग येथे दुपारच्या जेवणासाठी थांबणार आहे. त्यानंतर अंबड रोड मार्गे मार्गक्रमण करत काजळा फाटा येथे वृद्धाश्रमात मुक्कामी असणार आहे. मंगळवारी ( ता. १७) पालखी अंबड शहरातील चौडेश्वरी देवी संस्थान येथे मुक्कामी असेल. बुधवारी ( ता. १८) अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मुक्काम असेल. गुरुवारी ( ता. १९) गोदावरी नदी ओलांडून पालखी बीड जिल्ह्यात प्रवेश करील..पालखी सोहळ्याची तीन शतकांची परंपरा आहे. परकीय सत्ता, अन्य प्रतिकूल परिस्थिती, कोरोनाच्या काळामध्येही न थांबलेला हा सोहळा आहे. खानदेश, विदर्भाचा प्रवास करून आज या सोहळ्याने जालना जिल्ह्यात प्रवेश केला आहे. पुढील चार दिवस पालखीचा मुक्काम जालना जिल्ह्यात असेल. गोदावरी स्नान करून जालना जिल्ह्याचा निरोप घेऊ, राज्यात भरपूर पाऊस पडावा, शेतकरी समृद्ध, सुखी व्हावा, अशी मागणी आम्ही पांडुरंगाच्या चरणी करणार आहोत.-रवींद्र महाराज हरणे, पालखी सोहळा प्रमुख.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.