Ashadhi Wari 2025 : भेटी लागी जीवा ,लागलीसे आस... जोरदार आतिश बाजी करत संत मुक्ताईच्या पालखीचे भूम शहरात स्वागत
Pandharpur Wari : ३१८ वर्षांची परंपरा लाभलेल्या संत मुक्ताबाई पालखीचा भूम शहरात २४वा मुक्काम झाला असून, हजारो भाविकांच्या उपस्थितीत तिचे भव्य स्वागत करण्यात आले.
भूम : सावळ्या विठ्ठलाचे रूप डोळे भरून पाहण्यासाठी संत मुक्ताईच्या पालखीचे भूम शहरात हजारो वारकऱ्यासह शहरात आगमन झाले . आगमन होताच शहरवासीयांनी जोरदार आतषबाजी करत पालखी व वारकऱ्यांचे स्वागत करून दर्शन घेतले.