

Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग (बीड): मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण गाव हादरले आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग येथे भेट देऊन देशमुख कुटुंबीयांची विचारपूस केली. यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने अश्रूंना वाट मोकळी करत आपल्या दुःखाची कहाणी सांगितली.