संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बीड विशेष न्यायालयाने त्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर आता कराडने आपल्या वकिलांमार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत दोषमुक्तीच्या अर्जासह दोषारोप पत्रालाही आव्हान देण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.