
Santosh Deshmukh Murder Case: राज्यभर गाजत असलेल्या मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. आरोपींनी देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारे विशेष तपास पथकाने जप्त केली आहेत. यामध्ये गॅसचा पाईप, त्यावर काळ्या करदोड्याने तयार केलेली मूठ, पाच क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, लाकडी दांड्याला लोखंडी तारेचा दांडा, चार लोखंडी रॉड, लोखंडी फायटर, कत्ती तसेच तलवारसदृश शस्त्रांचा समावेश आहे.